हुमा कुरेशी होणार टॉम क्रूसची हिरॉईन !

‘द ममी’ चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलची बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने ऑडिशन दिली असून यात हॉलिवूडचे टॉम क्रूस, सोफिया बॉटेला सारखे दिग्गज कलाकार काम करणार आहेत, अशी हुमाच्या प्रवक्त्याने माहिती दिली. सूत्राने Read more…

The post हुमा कुरेशी होणार टॉम क्रूसची हिरॉईन ! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

huma-qureshi

huma-qureshi
‘द ममी’ चित्रपटाच्या तिसऱ्या सिक्वेलची बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने ऑडिशन दिली असून यात हॉलिवूडचे टॉम क्रूस, सोफिया बॉटेला सारखे दिग्गज कलाकार काम करणार आहेत, अशी हुमाच्या प्रवक्त्याने माहिती दिली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हुमा आणि टॉम क्रूस यांची यात ऑनस्क्रिन जोडी असेल. याचसाठी तिने ऑडिशन दिली आहे. सध्या हुमा हॉलिवूडचा चित्रपट ‘ऑक्युलस’च्या रिमेकमध्ये बिझी आहे. याच्यात तिचा भाऊ साकिब सलीम याची महत्वपूर्ण भूमिका आहे.

The post हुमा कुरेशी होणार टॉम क्रूसची हिरॉईन ! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

छगन भुजबळ यांना डिस्चार्ज; रवानगी पुन्हा ऑर्थर रोड तुरुंगात

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्यांची रवानगी पुन्हा एकदा ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर त्यांची रवानगी पुन्हा एकदा ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. दाढदुखीचा त्रास होत असल्यामुळं गेल्या सोमवारी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात असतानाचा त्यांचा एक फोटोही शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोतील भुजबळांचं बदललेलं रुपडं पाहून अनेकांना त्यावर विश्वास बसत नव्हता. आज सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्यानंतर भुजबळ यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. रुग्णालयातून बाहेर आलेल्या भुजबळांचा नवा अवतार पाहून सोशल मीडियात व्हायरल झालेला तो फोटो खरा असल्यावर शिक्कामोर्तब झालं. कारण, भुजबळ थकलेले दिसत होते. त्यांची दाढी वाढली होती. दाढीचे सगळे केस पांढरे झालेले दिसत होते. रुग्णालयाच्या पायऱ्या उतरतानाही त्यांना पोलिसांचा आधार घ्यावा लागत होता. पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कडक पोलीस बंदोबस्तात त्यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई – सोमवारी विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यापैकी शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला असल्याने उर्वरित आठ आरोपींना या प्रकरणात तूर्त दिलासा Read more…

The post मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

malegaon

malegaon
मुंबई – सोमवारी विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यापैकी शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला असल्याने उर्वरित आठ आरोपींना या प्रकरणात तूर्त दिलासा मिळाला आहे. हा निकाल विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दिला.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोन वर्षांपूर्वी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाला मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींबद्दल आपल्याकडे सबळ पुरावे नसल्याचे सांगितले होते. मात्र काही दिवसांपूर्वी एनआयएने आपल्या आधीच्या भूमिकेवरून घुमजाव करत या नऊ मुस्लिमांच्या सुटकेला विरोध दर्शवला होता. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश काय निर्णय देतात, याकडे लक्ष लागले होते. अखेर सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

नूरूल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फार्सी, फरोघ मगदुमी, शेख मोहम्मद अली, असीफ खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद यांचा या नऊ मुस्लिमा आरोपींमध्ये समावेश आहे. या सर्वांना २००६ मध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. यापैकी दोघांना मुंबईतील २००६ मधील ७/११ बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याने त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला होता.

The post मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

छगन भुजबळांचे हे छायाचित्र ?

मुंबई : सध्या महाराष्ट्र सदन आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या छगन भुजबळ यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले असून त्यावर चर्चाही होत आहेत. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकाराणात डरकाळी Read more…

The post छगन भुजबळांचे हे छायाचित्र ? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

chagan-bhujbal

chagan-bhujbal
मुंबई : सध्या महाराष्ट्र सदन आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या छगन भुजबळ यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले असून त्यावर चर्चाही होत आहेत. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकाराणात डरकाळी फोडणा-या या नेत्याची अवस्था सदर छायाचित्रात अतिशय केविलवाणी दिसत आहे.

विस्कटलेले केस, पांढरी दाढी आणि थकलेल्या अवस्थेत व्हिलचेअरवर बसलेले छगन भुजबळ! असे हे छायाचित्र सुरूवातीला फोटोशॉपचा वापर करून तयार करण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र, भुजबळांचे हे छायाचित्र खरे असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. रूग्णालयात त्यांच्या तपासण्या व चाचण्या सुरू असताना सिटी स्कॅन खोलीबाहेर नंबर येण्याची वाट पाहत असलेल्या भुजबळांचे हे छायाचित्र असल्याची माहिती मिळाली आहे.

दातांच्या उपचारांसाठी भुजबळांना काही दिवसांपूर्वी सेंट जॉर्ज रूग्णालयात भरती करण्यात आले होते. सोमवारी पुन्हा एकदा त्यांचा मुक्काम रूग्णालयातून आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात त्यांना रूग्णालयात कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक देण्यात आली नव्हती.

The post छगन भुजबळांचे हे छायाचित्र ? appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

केरळच्या मंत्र्याला त्याच्या ड्राइव्हरचेच आव्हान

निवडणुकीच्या आखाड्यात भाऊ-भाऊ, बाप-लेक आणि सासरा-सून हे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिल्याची उदाहरणं भारतीयांना नवी नाहीत. पण केरळ विधानसभेसाठी सुरू असलेल्या ‘मत’संग्रामात एका सामान्य ड्राइव्हरनं त्याच्या एकेकाळच्या मालकाला आव्हान दिलं आहे. मालक आणि नोकराची ही लढत केरळी मतदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

मटा ऑनलाइन वृत्त । तिरुवअनंतपुरम

निवडणुकीच्या आखाड्यात भाऊ-भाऊ, बाप-लेक आणि सासरा-सून हे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिल्याची उदाहरणं भारतीयांना नवी नाहीत. पण केरळ विधानसभेसाठी सुरू असलेल्या ‘मत’संग्रामात एका सामान्य ड्राइव्हरनं त्याच्या एकेकाळच्या मालकाला आव्हान दिलं आहे. मालक आणि नोकराची ही लढत केरळी मतदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

स्वत:च्या ड्राइव्हरशी सामना करण्याची वेळ आलेले हे मालक म्हणजे केरळचे सध्याचे समाजकल्याणमंत्री एम. के. मुनीर आहेत. मुनीर हे मुस्लिम लीगच्या तिकिटावर दक्षिण कालिकतमधून निवडणूक लढवत आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री सी. एच. मोहम्मद कोया यांचे सुपुत्र असलेले मुनीर हे कवी व गायकही आहेत. मुनीर यांनी १४ जुलै २००३ रोजी कोची येथून ‘इंडिया व्हिजन’ ही पहिलीवहिली मल्याळी वृत्तवाहिनी सुरू केली होती. मात्र, आर्थिक ओझ्यामुळं गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये ही वृत्तवाहिनी अचानक बंद करण्यात आली.

वृत्तवाहिनी बंद झाल्यामुळं पत्रकारांसह इतर ३०० कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यांचे चार महिन्यांचे पगारही अद्याप मिळालेले नाहीत. वाहिनी बंद झाल्यानंतर पत्रकारांना अन्य ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. मात्र, इतर कर्मचारी बेरोजगार झाले. पोट भरण्यासाठी काहींनी महामार्गांलगत ढाबे सुरू केले. बेरोजगार कर्मचाऱ्यांनी थकलेल्या पगारासाठी मुनीर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुनीर यांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांनी किंचितही हालचाल केली नाही. वृत्तवाहिनी पुन्हा सुरू होईल इतकंच ते सांगत आहेत.

‘इंडिया व्हिजन’च्या कर्मचाऱ्यांचा मात्र मुनीर यांच्यावरून विश्वासच उडाला आहे. त्यांच्या आर्थिक घोटाळ्यांमुळंच ही वेळ आल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप असून त्यांना धडा शिकवण्यासाठी मुनीर यांच्या वृत्तवाहिनीत ड्राइव्हर म्हणून काम करणारा ए. के. साजन त्यांच्याविरोधात निवडणुकीत उतरला आहे. तो उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ‘कुठे आहे आमचा पगार?’ ही साजन याची मुख्य घोषणा आहे. ‘मुनीर यांच्याविरोधात मला विजय मिळेल की नाही माहीत नाही. मात्र, मुनीर यांनी आमची फसवणूक केली आहे हे मला लोकांना सांगायचं आहे,’ असं साजन म्हणतात. आम्ही सगळे भुकेनं तडफडत असताना ते मज्जा मारत आहेत,’ असा आरोप ते करतात.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना आमदाराने मागितला बिल्डरकडून हिस्सा

मालमत्ता, पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित बिल्डर आणि तेथील स्थानिक राजकीय नेत्यांमधील आर्थिक देवाण-घेवाणीचा विषय ‘अळीमिळी-गुपचिळी’चा असतो. पण शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी ही ‘मांडवली’ जाहीररित्या उघड केली आहे. त्यांनी खुल्लमखुल्ला बिल्डरांकडे आपला ‘हिस्सा’ मागितला आहे.

संजीव शिवडेकर । मुंबई मिरर

मालमत्ता, पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित बिल्डर आणि तेथील स्थानिक राजकीय नेत्यांमधील आर्थिक देवाण-घेवाणीचा विषय ‘अळीमिळी-गुपचिळी’चा असतो. पण शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी ही ‘मांडवली’ जाहीररित्या उघड केली आहे. त्यांनी खुल्लमखुल्ला बिल्डरांकडे आपला ‘हिस्सा’ मागितला आहे. त्याचा व्हिडीओ ‘मुंबई मिरर’च्या हाती लागला आहे.

बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांसाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्यातील कायदेशीर अडथळे दूर करण्यासंदर्भात ते आमच्याकडे मदत मागतात. मोबदल्यात त्यांनाही मला काहीतरी हिस्सा द्यावा लागेल, असे आमदार चौधरी बोलताना दिसत आहेत. अभ्युदय नगरमधील अंदाजे ५ हजार कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पासंबंधी २०१५ मध्ये झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. शिवसेना नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेते. पण या प्रकरणात पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला.

प्रकल्पाच्या विकासामध्ये अडथळे आणण्यात मी समर्थ आहे, असे जाहीर वक्तव्यच चौधरी यांनी बिल्डर, प्रकल्प सल्लागार, सोसायटीचे प्रतिनिधी आणि स्थानिकांसमोर केला. पुनर्विकासाची प्रक्रिया काल केली आणि आज ती पूर्ण झाली, असे होत नाही. त्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. अनेक ठिकाणी ना हरकत आणि परवानग्या घ्याव्या लागतात. त्यासाठी माझ्या परवानगीचीही गरज असते, असेही त्या म्हणाले होते. आपला वाटा मागणे यात कोणताही राजकीय डाव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यात साधूंनी केला पोलिसांवरच हल्ला

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूंनी पोलिसांवरच हल्ला चढवला. हे साधू जुना आखाडा पंथाचे असून, त्यांच्यासोबत इतर भाविकही पोलिसांना मारहाण करत असल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. रविवारी ही घटना घडली आहे.

मटा ऑनलाइन वृत्त । उज्जैन

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूंनी पोलिसांवरच हल्ला चढवला. हे साधू जुना आखाडा पंथाचे असून, त्यांच्यासोबत इतर भाविकही पोलिसांना मारहाण करत असल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. रविवारी ही घटना घडली आहे.

उज्जैन येथे २२ एप्रिलपासून सिंहस्थ कुंभमेळा भरला आहे. या मेळ्यातील शिबिरात चोऱ्या होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. संशयावरून काही जणांना पोलिसांच्या ताब्यातही दिले होते. पण कोणतीही चौकशी न करता त्यांना सोडून दिले, असा आरोप साधूंनी केला आहे. या मेळ्यातील हिंसाचार आणि चोरीच्या घटनांच्या निषेधार्थ साधूंच्या एका गटाने मोर्चा काढला होता. तसंच काहींनी रास्ता रोकोही केला होता. त्यापूर्वी मंदिराजवळ अज्ञात व्यक्तीने साधूवर धारदार शस्त्राने वारही केले होते. त्यात साधू गंभीर जखमी झाला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाच्या सभेत आव्हाडांना स्टेजवरून उतरवलं

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला पाठिंबा देणारे आणि मुंबई-पुण्यातील सभेच्यावेळी त्याला सुरक्षा व्यवस्था पुरवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कन्हैयाने​च स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितल्याचे कळते.

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला पाठिंबा देणारे आणि मुंबई-पुण्यातील सभेच्यावेळी त्याला सुरक्षा व्यवस्था पुरवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कन्हैयाने​च स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितल्याचे कळते. एका खासगी वाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे कन्हैयाचे ‘चाहते’ असलेले आव्हाड यांना मुंबई आणि पुण्यातील सभेत प्रेक्षकांमध्येच बसून सारा कार्यक्रम पाहावा लागला.

पंतप्रधान मोदींवर टीका करणारा कन्हैया सध्या विरोधकांसाठी आशेचा किरण वाटू लागल्याने विविध पक्षांचे अनेक नेते त्याला पाठिंबा देत आहेत. यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड सर्वात पुढे आहेत. या आधी फेब्रुवारी महिन्यात कन्हैयाचे जेएनयूमधील प्रकरण समोर आले, तेव्हा आव्हाड यांनी ठाण्यात कन्हैयाने दिलेल्या ‘आझादी’च्या घोषणांचे मोठे पोस्टर लावले होते. कन्हैयाचे भाषण पुण्यात वेळेत व्हावे म्हणून आव्हाडच त्याला पुण्याला घेऊन आले आणि सभा संपल्यावर विमानतळावर घेऊन गेले, अशी माहिती मिळते. कन्हैयाच्या अवती-भवती देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गराडा होता. मात्र प्रत्यक्ष सभेच्या वेळी आमदार म्हणून आव्हाड स्टेजवर जाऊ लागले, तेव्हा त्यांना अडवण्यात आले. आपले स्टेज हे तरुणांचे आहे आणि या स्टेजवर केवळ विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थीच राहतील, असे कन्हैयाने भाषणादरम्यान स्पष्ट केले. मुंबईतही आव्हाड यांना प्रेक्षकांमध्येच बसून सभा पाहावी लागली होती. त्यामुळे आव्हाडांसह साऱ्याच राजकीय नेत्यांना हा इशारा असल्याची चर्चा सुरू होती.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीनच्या प्रखर विरोधानंतर भारताची माघार

नवी दिल्ली : भारताने चिनी दहशतवादी डोल्कन इसा याला व्हिसा दिल्याच्या मुद्यावर चीनने केलेल्या प्रखर विरोधानंतर भारताने माघार घेत इसाचा व्हिसा रद्द केला आहे. इसाने चीनच्या शिनजियांग उइगर या प्रांतात Read more…

The post चीनच्या प्रखर विरोधानंतर भारताची माघार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

dolkan-isa

dolkan-isa
नवी दिल्ली : भारताने चिनी दहशतवादी डोल्कन इसा याला व्हिसा दिल्याच्या मुद्यावर चीनने केलेल्या प्रखर विरोधानंतर भारताने माघार घेत इसाचा व्हिसा रद्द केला आहे. इसाने चीनच्या शिनजियांग उइगर या प्रांतात दहशतवादी कारवाया केल्याचा चीनचा आरोप आहे.

सध्या डोल्कन इसा जर्मनीत वास्तव्याला असून त्यांना इनिशिएटिव्ह फॉर चायना या संस्थेने धर्मशाला येथे होणा-या एका परिषदेसाठी आमंत्रित केले होते. इसा यांच्यासह चीनमधील अनेक फुटीरतावादी नेते या परिषदेला येणार आहेत. चीनमध्ये लोकशाही स्थापित करण्याबद्दल ते चर्चा करणार आहेत. दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात आणलेला प्रस्ताव चीनमुळे मंजूर होऊ शकला नव्हता. त्यामुळे भारताने चीनमधील फुटीरतावादी नेते डोल्कन इसा यांना व्हिसा मंजूर करून त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याचे बोलले जात होते.

The post चीनच्या प्रखर विरोधानंतर भारताची माघार appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

कन्हैया कुमारला शाखाप्रमुख करा: भाजपचा सेेनेला सल्ला

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाचा नेता कन्हैया कुमारला देशद्रोही ठरविण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर तोफ डागणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. ‘देशद्रोही व दहशतवाद्यांचं समर्थन करणाऱ्या कन्हैया कुमारचे विचार शिवसेनेला इतके भावत असतील तर शिवसेनेनं कन्हैयाला व त्याच्या मित्रमंडळींना शाखाप्रमुख करावं,’ असा सणसणीत टोला भाजपनं हाणला आहे.

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाचा नेता कन्हैया कुमारला देशद्रोही ठरविण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर तोफ डागणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. ‘देशद्रोही व दहशतवाद्यांचं समर्थन करणाऱ्या कन्हैया कुमारचे विचार शिवसेनेला इतके भावत असतील तर शिवसेनेनं कन्हैया व त्याच्या मित्रमंडळींना शाखाप्रमुख करावं,’ असा सणसणीत टोला भाजपनं हाणला आहे.

केंद्र व राज्यातील सरकारमध्ये भाजपसोबत असूनही विरोधकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेनं सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच भाजपला लक्ष्य करण्याची रणनीती आखली आहे. कन्हैया कुमार याच्या अटकेच्या निमित्तानं शिवसेनेनं पुन्हा भाजपला लक्ष्य केलं आहे. कन्हैयावर चुकीच्या पद्धतीनं देशद्रोहाचं लेबल लावण्यात आलं आहे, असा आरोपच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केला होता. उद्धव यांच्या या भूमिकेमुळं भाजपला जोरदार धक्का बसला. आतापर्यंत शिवसेनेच्या टीकेकडं दुर्लक्ष करणाऱ्या भाजपनं यावेळी मात्र शिवसेनेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

‘शिवसेना ही आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही. दहशतवाद्यांचा जयजयकार करणाऱ्यांची बाजू घेण्याची वेळ शिवसेनेवर आली असेल, तर शिवसेना बदलली आहे का याचं आत्मचिंतन शिवसेना पक्षप्रमुखांनी करायला हवं,’ असं भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं. ‘उद्धव ठाकरे यांना कन्हैया कुमारचे विचार एवढे आकर्षक वाटत असतील तर त्यांनी कन्हैयाला व त्याच्या साथीदारांना त्यांच्या शाखांचा प्रमुखपद द्यावं. म्हणजे जनतेलाही त्यांचा राष्ट्रवाद कळेल,’ असा खोचक सल्लाही व्यास यांनी दिला.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट