कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

कारदगा हे कर्नाटकतील चिक्कोडी तालुक्यातील गाव. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या या गावात मराठी भाषीकांची संख्या अधिक आहे. कर्नाटकात गेलो म्हणून काय झाले आम्हाला आमच्या मातृभाषेवर प्रेम आहे. कोठेही जाऊ कोठेही राहू पण मराठी आमची मायबोली आम्ही कायम ठेऊ हा निर्धार या गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच या गावात गेली वीस वर्षे न चुकता साहित्य संमेलन होत आहे. यंदाही हे संमेलन झाले. या संमेलनास 89 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. मराठीचा या गावात होणारा गजर पाहून ते भारावून गेले. ग्रामीण भागात मराठी विषयी असणारी आपुलकी आपलेपणा, मराठीचा हा बाणा पाहून मराठी किती समृद्ध आहे याचीच प्रचिती येथे येते. जात, पंथ, धर्म बाजुला ठेऊन सर्वचजण या व्यासपीठावर एकत्र येतात. मराठी भाषेबद्दल असणारे हे त्यांचे प्रेम पाहून कोणीही भारावून जाईल असेच येथील वातावरण असते. 
वारकरी संप्रदायाने मराठीची पताका उंच फडकावली. मग या संमेलनात वारकऱ्यांची आठवण होणार नाही असे घडणारच नाही. सकाळी काढलेल्या ग्रंथ दिंडीत वारकरी वेशात बालगोपालांचा सहभाग, तालात, सुरात त्यांनी केलेला मराठीचा गजर, भजन, कीर्तन मराठीची खरी ओळख करुन दिल्याशिवाय राहात नाही. नऊवारीत- सहावारीत नटलेल्या मुलींमधून मराठी संस्कृती विषयी असणारी आपली आपुलकी, मराठी विचाराशी असणारे आपले प्रेम ओसंडून वाहताना दिसत होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरात महिलांच्या उत्स्पुर्त प्रतिसादात निघालेली ग्रंथदिडी सीमाभागात मराठीचा हा ताठर बाणा कायम राखेल असाचा विश्वास दाखवत होती. संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या दिंडीचे कौतुक करताना श्री. सबनीस म्हणाले बळीचे राज्य, बहुजन श्रमिकांचे राज्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम या दिंडीत पाहायला मिळाला. पण त्याचबरोबरच दुष्काळाची जाणीव करुन देणारे वास्तवाचे भानही पाहायला मिळाले. यावरून या गावाची वैचारिक, सामाजिक समृद्धता लक्षात येते. येथील ग्रामीण साहित्यात विठ्ठल आणि भक्ती केंद्रस्थानी आहे. धुमान साहित्य संमलेनाने संत नामदेवांना राष्ट्रीय पातळीवर नेले तर कारदगा संमेलनाने धर्मनिरपेक्षतेचे सूत्र बांधले.
सीमाभागात मराठीच्या गौरवाचा आदर्श इतर गावांनीही व महाराष्ट्राने घ्यायला हवा. मराठीच्या समृद्धीसाठी, मराठी संस्कृती जोपासण्यासाठी मराठी विषयीचे आपले प्रेम, आपुलकी कायम ठेवण्यासाठी अशा साहित्याच्या गावांना भेट द्यायला हवी. नेहमी यावे नेहमी नांदावे असे हे गाव मराठीचा एक वेगळा बाणा कायम ठेवत आहे याबद्दल संमेलन आयोजकांचे मनापासून आभार मानावेत असे वाटते.
श्री सबनीस सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात माझा कृषि ज्ञानेश्वरी या पुस्तकाचा गौरव केला शेणाला सोन्याचा भाव आला आहे इतके शेणाचे महत्त्व आहे जमीन उत्तम तर शेतकरी उत्तम हे ओळखून सेद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही त्यांनी केले ज्ञानेश्वरीतील शेती विषयक ओव्यावर आधारित या पुस्तकाचा गौरव केला याबद्दल सबनीससरांचे आभार मानायलाच हवेत
– राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
श्री अथर्व प्रकाशन, साळोखेनगर, कोल्हापूर


प्लेसमेंट(ल) : पूर्वार्ध

“मे  आय कम इन सर? ” किलकिल्या दरवाजातून बघणारा चेहरा मला विचारतो…
“यस प्लीज” खोटं हसू चेहऱ्यावर आणून मी म्हणतो. जरा स्थिरस्थावर झाल्यावर
“सो कॅन यु प्लीज टेल मी अबौट योर्सेल्फ?” ने प्रश्नोत्तरांचा ओघ सुरु होतो… एका पाठोपाठ एक कॅन्डीडेट्स येणार  असतात. नॉलेज , कॉन्फीडन्स, बॉडी  लँग्वेज वगैरे नाही नाही त्या गोष्टी वापरून मला१५ पैकी ३ लोक निवडायचे असतात… आधीच aptitude, ग्रुप डिस्कशन यामध्ये अर्धा दिवस संपलेला असतो. त्यामुळे साधारण दहा मिनिटं ते अर्ध्या तासात एक या हिशेबाने मी मुलाखती घेत असतो. feedback फॉर्म्स भरून द्यायला थोडा वेळ मिळतो तेव्हा मी (बहुधा डीन च्या) केबीन च्या खिडकीतून बाहेर पाहत उगीचच सिनेमात दाखवतात तसं थंडावलेल्या कॉफीचे घुटके घेत उभा राहतो…
^(http://marathiplus.in/goto/http://2.bp.blogspot.com/-j3KLyQx6DeM/VlieuZUQlPI/AAAAAAAAGF4/x8cARDrLp4I/s1600/hiring.jpg)

“फोर्ब्ज मार्शल आलीये, तू बसणार नाहीयेस का?” पुरुषोत्तम ची practice चालू असताना कोणीतरी येउन म्हणाल्यावर मी पळतच तिकडे गेलो. पहिल्यांदा aptitude टेस्ट होती. मी ती दिली. त्यात shortlist  होणाऱ्या  लोकांची टेक्निकल टेस्ट झाली . त्यामधून काही मुलं सिलेक्ट झाली…aptitude नंतर रिझल्ट लागणार असल्यामुळे तिथंच  थांबावं  लागलं– तीच परिस्थिती टेक्निकल नंतर. मुलाखतीसाठी निवड झालेल्या मोजक्या मुलांमध्ये माझं नाव आलं आणि अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार पहिलंच! जेव्हा माझ्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर ने माझ्याकडे पाहिलं  तेव्हाच मला पहिल्यांदा माझा अजागळ  “पुरुषोत्तमी” अवतार जाणवला!

“असा जाणारेस इंटरव्यूला ?” त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा  मराठी अनुवाद. (एकांकिकेत मी मरतो आणि त्याक्षणी जमिनीवर लोळण  घेतो  असा सीन असल्यामुळे ) मळकं गोल गळ्याचं टी शर्ट आणि जमिनीच्या बाजूला घासून फाटलेली मळकी जीन्स, त्याखाली फ्लोटर्स असा माझा अवतार मला जाणवला. समोर सुटाबुटात वावरणारे कंपनीतले लोक होते. “मी पटकन कपडे बदलून येतो”
“अरे मुर्खा, तुला आत बोलवताहेत  ते” (पुन्हा सोयीस्कर मराठी अनुवाद!)
“सर प्लीज त्यांना सांगा ना, मी चटकन तयार होऊन येतो”
यापुढे आमच्यात जो संवाद झाला त्यानंतर “टीपीओ या व्यक्तीचा उगम हा मुळात भाव खाण्यासाठी आणि असहकार्य करण्यासाठी झाला आहे” असे माझे मत तयार झाले!

धावत पळत जाऊन मी विनोदी वेशभूषा करून आलो. कसेतरी विंचरलेले केस, घाई गडबडीने टक-इन केलेलं शर्ट, कोणाचेतरी मागून घेतलेले थोड्या मापाचे पायातून बाहेर निघणारे शूज अशा अवतारात बदकचालीने मी पुन्हा तिथे पोहोचलो. टीपीओ तिथे नव्हता,
“माझा इंटरव्यू होता” हातात फाईल्स घेऊन लगबगीने ये जा करणाऱ्या एका बाईला मी म्हटलं.
“सो?” तिने माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं…
“अं,,, मी,,,”
“तुझं नाव ?” –अनुवाद! हातातल्या फाईल्समधले कागद चाळत तिने विचारलं.
मी नाव सांगितलं. ती एच आर होती. त्यामुळे आमच्यात पुढे जो सुखसंवाद झाला तो पुढील प्रमाणे  अनुवादित….
“तुझं  नाव सगळ्यात पहिल्यांदा कॉल औट  केलं होतं “
मी- “खरंतर  माझे कपडे… “
“वेळेची काही किंमत आहे कि नाही तुला? हे कॉलेज नाही कॉर्पोरेट कंपनी आहे” तिचं  कॉलेज  बहुधा वेळा पाळत नसावं !
मी – “आएम सॉरी “
“सॉरी ? तू इंटरव्यू साठी आलाहेस आणि तुला वेळेत येता येत नाही?” वगैरे वगैरे….
मी तिला उलट उत्तर देत निर्लज्जासारखा तिथेच उभा राहिलो. ती तिथून तावातावाने निघून गेली. आणि आमचा टीपीओ लांबून मजा बघत होता!! सुदैवाने सगळ्यात शेवटी मला मुलाखतीकरता आत बोलवण्यात आलं. मी आतापर्यंत दिलेली ती सर्वोत्कृष्ट मुलाखत असावी. इंटरव्यूअर ने मला चहा ऑफर केला आम्ही इतरही गप्पा मारल्या आणि मी बाहेर पडलो.

थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार होता आणि आमच्या टीपीओनं सांगितलं कि ‘फायनली कोणाकोणाला घ्यायचं ते त्या अमुक अमुक madam आणि इंटरव्यू पँनल ठरवणार आहेत,’ बोलता बोलता त्याने जो दिशानिर्देश केला तो त्या सुखसंवाद करणाऱ्या madam  कडेच! म्हणजे माझं भविष्य मी मघाशीच ठरवलं होतं!!
इंटरव्यू हा फक्त फार्स होता!! मी चमत्काराची अपेक्षा करत होतो परंतु केबिन मध्ये madam च्या विरुद्ध बाजूला बसलेले panel मेम्बर्स बघून निकाल काही फारसा सुखावह नसणार हे कळतच  होतं! फायनल सहापैकी चार लोक निवडले गेले होते. मी त्यात नव्हतो! बदकासारखा चालत मी घरी पोचलो आणि पहिल्यांदा कपड्यांचा एक सेट तयार करून ठेवला आणि माझ्या मापाचे बूट कोणाकडे आहेत ते ताबडतोब बघायचंही ठरवून टाकलं!

नंतर कधीतरी इमर्सन आली. यावेळी मात्र मी ठरवलेले कपडे घालून कॅम्पस साठी पोचलो. तयारीने! एप्टीट्यूड मधून शॉर्ट लिस्ट झालो मग टेक्नीकल क्लिअर केली..सगळे निकाल पूर्वीसारखेच येत गेले.. अगदी इंटरव्यूचा सुद्धा! :) पण ड्रामेटिकली.. दहा जण इंटरव्यू साठी सिलेक्ट झाले होते त्यापैकी 4 जणांची नाव पुकारण्यात आली. त्यात माझं नाव होतं.एक गोड शिरशिरी अंगभर सळसळत गेली. त्यापाठोपाठ “except these names rest all are selected” असे शब्द कानात जाळ ओतत गेले. क्षणापूर्वी असणारं “झालं बुवा सिलेक्शन” हे क्षणभराचं फिलिंग त्या वाक्यात मातीमोल झालं!

–X-O-X–
” दिज आर रेस्ट ऑफ़ द फॉर्म्स.. या एका कैंडीडेटला एच आर राउंड साठी घ्या. या एकाला त्या पॅनेलकड़े पाठवा. आएम इन डायलेमा.” मी सूचना देत एच आर ने दिलेले बाकीचे सी व्ही नजरेखालुन घालतो. “Objective : to pursue challenging career in an organization that would enable blah blah blah..” जर हिला विचारलं की तुझं करिअर ऑब्जेक्टीव् एका दमात..एवढं कशाला? नुसतं पाठ म्हणून दाखवता येईल का? तर सांगता येणार नाही.. तीस चाळीस टक्के माहिती म्हणजे निव्वळ निरुपयोगी! ऑनलाइन जगात घरचा पत्ता पासपोर्ट नंबर आईवडीलांचे पूर्ण नाव कॉलेजातल्या कुठल्यातरी इव्हेंट चं नुसतं पार्टीसिपेशन हे रेझुमी वर कशाला हवं? पण असो! 
मी किलकिल्या दरवाजात उभ्या एच आर rep ला हातातल्या सी व्ही वरचं नाव वाचून दाखवतो…. दरवाजा बंद होतो आणि थोड्याच वेळात पुढच्या उमेदवाराच्या चेहऱ्यासकट पुन्हा किलकिला होतो…
–X-O-X–
“इंटरव्यूला बाहेर पडतोस म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव करायला पाहिजे तुला.. मैं इंटरव्यूतक पहुँचता तो कभी बाहर नहीं निकलता” छुपा अर्थ स्पोकन इंग्लिश मधे वीक आहेस तू..पासून “काही नाही रे होशील सिलेक्ट.. आमची तर एप्टीट्यूडच crack करायचे वांधे आहेत” पर्यन्त सगळ्या पद्धतीचे सल्ले मिळत होते. तीन कॉलेजचे उमेदवार एकत्र असल्याने फिल्टर लावायला सोपं पड़ावं म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स ने टेक्निकल मधून शॉर्ट लिस्टेड लोकांना ग्रुप डिस्कशनला बोलावलं होतं. आमच्या ग्रुप ला ब्रेन ड्रेन हा विषय होता.. स्वदेस च्या शाहरुख चं उदाहरण देऊन मी बऱ्यापैकी बोलबच्चन दिले.. 12 जणांच्या आमच्या ग्रुप मधून 3 जण पी आय साठी निवडले गेले.. मी त्यात होतो. कमाल म्हणजे ग्रुप डिस्कशन मधून पुढे न गेलेल्या लोकांमधे “माझं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव व्हायला पाहिजे” म्हणणाऱ्या व्यक्ती होत्या.. पर्सनल इंटरव्यू छान झाला.. आमच्या स्ट्रीमचे आम्ही दोघेजण होतो  पण त्यांना एकच रिक्वायरमेंट होती.  सिलेक्ट झालेल्या लोकांना ऑफर लेटर्स लगेच मिळणार अशी वदंता होती. ती खरी ठरली.. काही लोक खाकी लिफाफे घेऊन आले आणि आमच्यापैकी देशपांडे नावाच्या मुलीच्या हातात तो लिफाफा पडला. नशीबाने (किंवा इतर जे काही फॅक्टर्स असतात त्या सगळ्यांनी) पुन्हा एकदा टांग दिली होती!  संधी सारखी सारखी दरवाजा ठोठावत होती पण कॅम्पस सिलेक्शनचं गणित काही सुटता सुटत नव्हतं..
बॅक्सटर फार्माच्या प्रिलिमनरी राउंड मधून पुढे गेलेल्या लोकांचा जीडीपीआय चा एकच राउंड होता..  तिथंही इंटरव्यूतुन बाहेर पडलो. मँकलुईड फार्मा ला पण तेच. त्यांनी तर मी आणि अजून एकजण सोडून सगळ्यांना घेतलं! :)  माझ्यासाठी तर ही  हाईट  होती!! काहीतरी चुकत होतं खास पण काय तेच कळत नव्हतं आणि कुणी सांगणारंही नव्हतं..
वर्ष संपत होतं तसं कंपन्यांच्या ओघ आटला होता. आता चुकून माकुन एखादी कंपनी येत होती परंतु माझ्या स्ट्रीम साठी नव्हती किंवा माझे एवरेज मार्क्स पुरेसे नव्हते किंवा टी पी ओ शी निर्माण झालेली कटुता यापैकी किंवा अशा अनेक तत्कालीन कारणांमुळे मला अपियर होता येत नव्हतं..  बरोबरीचे बरेच लोक प्लेस झाले होते त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंट हा विनाकारण प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. आतापर्यंत मी इंटरव्यू मधून कसा बाहेर पडलो हे ऐकण्यात कोणाला काही स्वारस्य असेल असं वाटत नव्हतं!
–X-O-X–
..ही आतापर्यंतची तिसरी कॉफी होती. “Have you had your lunch” मी उगाच समोरच्याला कम्फर्टेबल फिल करवायचा प्रयत्न केला. त्यानं नाही म्हटलं असतं तर मी त्याला “जा दोन घास खाऊन घे” असं मुळीच म्हणणार नसतो! कोणतंही उत्तर चालू शकेल असा तो एक प्रश्न असतो परंतु काहीजण त्याचंही उत्तर फार सीरियस होऊन देतात.. जसं की आज उपास आहे, सकाळचा नाश्ता कसा भरपेट होता वगैरे! ज्याचा त्याचा प्रश्न! साला हा ए सी पण ना.. ही उरलेली कॉफी पण गारढोण होऊन गेली!
–X-O-X–
“एक्स एल डायनेमिक? कसली कंपनी आहे ही? सब प्राइम मॉरगेज पहिल्यांदा ऐकतोय मी” मी म्हटलं. “तुला काय करायचंय? तीन लाखाचं पॅकेज देतेय. एवढा पगार देत असतील तर मी दरवाजात उभा राहून येणाजाणाऱ्याला सॅल्यूट मारायला पण तयार आहे!” मित्राने ऐकीव माहिती सांगितली. मी घाईघाईने आमच्या कम्युनिकेशन सेंटर कड़े गेलो.. तुडुंब गर्दी होती. कमी मार्क्सचा क्रायटेरिया आणि ज्यांचं फ़क्त एका कंपनीत सिलेक्शन झालं आहे त्यांना बसण्याची संधी यामुळे एवढं पब्लिक जमलं होतं! इथं माझं एका कंपनीशी जमता जमत नव्हतं आणि हि आधी कुठे ना कुठे सिलेक्ट झालेली मुलं जास्त पैशाच्या आशेने इथंही गर्दी करत होती!
एप्टीट्यूडसाठी तीन चार क्लासरूम्स भरून मुलं होती. आधी म्हटलेली काही अलरेडी  प्लेस् झालेली मुलं आणि बाकीचा सगळा उरलेला कचरा.. माझ्यासकट! त्यातून कंपनीने एक क्लासरूम भरेल इतकी मुलं सिलेक्ट केली! त्यांची बिझनेस कॉम्प्रिहेन्शनची टेस्ट झाली. ही टेस्ट म्हणजे अक्षरशः तीन पानांचा इंग्लिशचा पेपर होता. असली टेस्ट कोणीच घेतली नव्हती आतापर्यंत. त्यात शॉर्टलिस्ट होणाऱ्यांची नावं दुसऱ्या दिवशी जाहीर होणार असं सांगितलं गेलं. 
दुसऱ्या दिवशी एका मित्राचा फोन आला की कॉलेजच्या गेटवर शॉर्टलिस्टेड मुलांची नावं लागली आहेत. मी चकितच झालो! पोरांच्या इज्जतीचे वाभाडे डायरेक्ट कॉलेजच्या वेशीवर? असं कसं कोणी करेल?

उत्तरार्ध: ^(http://marathiplus.in/goto/http://akhildeep.blogspot.in/2015/12/blog-post.html)


प्लेसमेंट(ल) : उत्तरार्ध

पूर्वार्ध ^(http://marathiplus.in/goto/http://akhildeep.blogspot.in/2015/11/blog-post.html):
…पण तसंच होतं! सुदैवाने माझं नाव त्यात होतं.. साधारण 10 15 मुलं ‘हिटलिस्ट’ वर होती. म्हणजे पुढच्या राउंडला तरी मासळीबाजार नसणार! पण कसचं काय! पुढचा राउंड तिसरयाच् कॉलेज ला होता आणि तिथेही 8 9 कॉलेजची पोरं होती…
–X-O-X–
“गो थ्रू दिज टू प्रोफाइल्स. द अदर पॅनेल वांट्स यू टू इंटरव्यू देम.” मी प्रोफाईल्स  चाळतो. दोघांपैकी aptitude चे मार्क्स जास्त  आहेत त्याला मी बोलवतो. चेहरा बघितल्यावर मला ग्रुप डिस्कशन चा राउंड आठवतो. हा पोरगा बोलतो फर्मास! एकदम टू  द पॉइंट! बघू काय सांगतो ते.
” प्लीज”   मी खुर्चीकडे हात दाखवून त्याला बसायला सांगतो आणि त्याचा रेझुमे चाळायला लागतो.
इंटरव्यू सुरु होतो. त्याचा कॉन्फीडंन्स हा ओवरकॉन्फीडंन्स नाहीये ना हे चेक करणारे, काही ऑनलाईन न मिळणारे ट्रीकी क्वेश्चन्स, काही तयार केलेली पझल्स मी त्याला विचारतो. बाकीच्यांना विचारली तशीच पण तीच नाही. न जाणो आधी बाहेर गेलेल्यांना याने काही विचारलं असेल तर! कारण मीही तेच करायचो!!

कॉलेजला गेलो तर हीssss  गर्दी! आमच्या कंपनीच्या पुढच्या राउंडसाठीच शंभरएक जण! मी अवाक!! च्यायला हि सगळी पोरं त्या त्या कॉलेज ची शॉर्टलिस्टेड पोरं असणार. दहा कॉलेजेस जरी असली तरी झाले कि शंभर. मी आवंढा गिळला. कंपनी दहा-पंधरा लोक घेईल अशी सुरुवातीला अटकळ होती पण अख्ख्या  युनिवर्सिटीतून दहा पंधरा घेईल असा कोणी अंदाजच बांधला नव्हता.
“ऐसा कोई करता है  क्या? कुछ राउंड एक तरफ  बाकी के राउंड दुसरी तरफ! हमारे कॉलेज  के कुछ लोग तो  आयेही नही” तरीपण इतकं पब्लिक होतं! जास्त पब्लिक म्हणजे जास्त कॉम्पीटिशन असा साधा सरळ हिशोब होता.
“हि पहिलीच कंपनी असं  करणारी”
“नवीन ट्रेंड सेट करतायत,दुसरं काही नाही”
आमच्या टी पी ओ ने सांगितलं कि आता सिम्पोजिअम होणारेत. मी कधीच हा प्रकार actively केला नव्हता. पण आता काय आलिया भोगासी असावे सादर!!
दहा दहा चे ग्रुपस करून चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. जो जी चिठ्ठी उचलेल त्याने त्या विषयावर आपल्या ग्रुप मधल्या उरलेल्या नऊ  जणांना ३ मिनिटांत आपले विचार सांगायचे आणि उरलेल्या ७ मिनिटात ते जे काही प्रश्न विचारतील त्यांची उत्तर देऊन चर्चा करायची असा तो प्रकार होता.
आमच्या ग्रुप च्या सगळ्यांचं आटपायला दोन-अडीच तास लागले. यातून निवडले जाणाऱ्यांचेच इंटरव्यू होणार होते. सिम्पोजिअमचे निकाल कन्सोलिडेट होऊन यायला तासभर लागला. ज्यांची नावं पुकारली जात होती ती मुलं मांदियाळीतून निघून आतल्या हॉल मध्ये जात होती.तेवढ्यात…. माझ्या नावाचा पुकारा झाला!

–X-O-X–

मी मान वर करून बघितलं. आमची एच आर पर्सन मलाच हाक मारत होती. “वि नीड टू  डिक्लेअर रिझल्ट्स बिफोर फाय… कॉलेज  स्टाफ साडेपांच बजे निकाल जाता है. धिस इज द लास्ट वन. शाल आय सेंड हर इन?”
“डू  आय have अ चॉईस ?” मी विचारल्यावर ती हसून शेवटच्या उमेदवाराला बोलावते.
“बी कम्फर्टेबल! लेट्स बिगीन विथ योर इंट्रोडक्षन..”
” माय नेम इज…. “
एक कान तिकडे ठेऊन मी परत बारकाईने तिचा सी व्ही वाचू लागतो.
” यू  have  स्कोर्ड गुड मार्क्स इन टेन्थ as  वेल as , व्हॉट  वेन्ट  रॉंग  इन इंजिनियरिंग?”
“एक्चुअली माय  मदर एक्स्पायर्ड व्हेन आय वॉज इन स्कूल…”
तिच्या पेरेंट्स पैकी  कोणीतरी एक तिच्या लहानपणीच वारलेलं आहे हे त्याच्या कौटुंबिक माहितीवरून कळलं परंतु इंजिनियरिंगच्या चारही वर्षांचे मार्क्स कमी असण्याशी त्याचा काय संबंध? सहानुभूती मिळवायला बघतेय का ही ?

–X-O-X–

 हृदयातली धडधड थोडी मंदावली. आता शेवटचा मुलाखतीचा राउंड. माझा आतापर्यंत वीक ठरलेला पॉइंट. केबिन मध्ये बसलेले ३ जण इंटरव्यू घेंत होते. एकामागोमाग एक मुलं आत जाउन बाहेर येत होती. काही दहा मिनिटात, काही वीस तर काही अर्ध्या अर्ध्या तासानंतर!  माझं नाव पुकारलं गेलं. साधारण १० -१५ मिनिटं प्रश्नोत्तरं  झाली. मी बाहेर आलो. इंटरव्यूअर्स च्या मनाचा थांग घेऊन आडाखे बांधणं कठीण होतं असं एकंदरीत जाणवत होतं. असो जे होईल ते होईल असा विचार करून मी बाहेर पडलो. संध्याकाळी ५ वाजता रिझल्ट जाहीर होतील असं  सांगण्यात आलं होतं. माझी मुलाखत पहिल्या काही मुलातंच असल्याने मला साधारण ४ तास घालवायचे होते. सकाळपासून या कॉलेज मध्ये इकडेतिकडे पळापळ करून वैताग आला होता. ४ तास करायचं तरी काय? माझ्या कॉलेजची  जी पोरं होती त्यापैकी मोजकीच उरली होती, त्यात माझ्या ओळखीचं असं  कोणीच नव्हतं. सिलेक्ट कि रिजेक्ट ते कळायला थांबायलाच हवं होतं.  शेवटी जवळच्याच एका मल्टीप्लेक्स मध्ये गेलो आणि जो लगेचचा शो होता त्याचं  तिकीट काढून जाऊन बसलो!. नको ती विचारचक्र आणि नको ती तगमग! निदान हा थोडा वेळ तरी डोक्याला शॉट नाही. सिनेमा संपला मी बाहेर आलो आणि परत कॉलेजमध्ये गेलो तर कळलं कि अजून प्रोसेस चालूच आहे!! आज निकाल लागण्याची शक्यता शून्य पूर्णांक शून्य शून्य एक इतकी आहे! तसाही एवढ्याश्या शक्यतेसाठी जीवाला त्रास करून घेणारा मी नव्हतो. सिलेक्ट झालो तर उद्याही कळेल पण इथे थांबून रिजेक्ट झालो तर परतीचा प्रवास सुद्धा कंटाळवाणा होणार. उरलेली संध्याकाळ आणि रात्र बोंबलणार ते वेगळच! मी सरळ कलटी  मारली आणि अर्ध्या तासात घरीसुद्धा आलो!

–X-O-X–

“अगर मै हिंदी मी बोलू तो चलेगा क्या?”
” मुझे शायद चलता मगर हमारी कंपनी जिन क्लायंट्स के लिये काम करती है उन्हे हिंदी नही समझती!”
“ok सर, आय विल टॉक इन इंग्लिश”
“शाल वी  प्रोसिड?”
मुलाखत पुढे चालू होते. अभ्यासाव्यतिरिक्त केलेल्या कामांची माहिती, काही कार्यक्रमांमधला सक्रिय सहभाग, अनुभव या अनुषंगाने गाडी पुढे पुढे सरकतच राहते.

–X-O-X–

एक सिम्पोजिअम, एक इंटरव्यू, एक सिनेमा  आणि जाण्यायेण्याचा ट्राफिकमधला मोठ्ठा प्रवास एवढा दिवसाचा हिशेब जमवून मी बेडवर पडलो. कॉलेजमधल्या दिवसांत एका दिवसात एवढं काम खूपच होतं! तेवढ्यात माझा फोन वाजला.
“अरे कुठे आहेस तू? तुझं नाव घेतलंय इकडे” दबक्या आवाजात पलीकडला बोलला
“कोणी?”
“अरे कोणी काय कोणी? तू सिलेक्ट झाला आहेस!” परत दबका आवाज आला
“क्काय??” मी जवळजवळ ओरडलोच “नक्की?”
“मग मी काय उगीच सांगतोय. तू ये इकडे पुढचा एक राउंड आहे बहुतेक.”
“अरे काय चाललंय यांचं? डायरेक्ट म्यानेजर निवडतायत  कि काय?” मी वैतागलो
“अरे आता वीस पोरं सिलेक्ट केली आहेत, पण त्यांना सगळ्यांना भेटायचं आहे”
“पण मी परत आलोय आता”
“मग काय झालं ये परत  इकडे”
“पण मला अजून अर्धा तास….  “
“बघ बाबा काय ते… मी सांगायचं काम केलं”
“प्लीज त्यांना सांग मी अर्ध्या तासात पोचतो”
“बरं मी सांगतो पण फक्त इन्फर्म करणार हां मी, कन्विन्स नाही”
“thanks मित्रा! पोचतोच मी “

पुढच्या वीस पंचवीस मिनिटात एका एकदम जवळच्या मित्राने बहुतेक “हि नोकरी मिळाली नाही तर मी आयुष्यातून उठणार” असा समज करून घेऊन अतिशय धोकादायक पद्धतीने बाईक चालवत मला त्या कॉलेज मध्ये पोचवलं! पुढचा राउंड  सुरु झाला होता.
“व्हेअर वेर यू ?”
“सर वन ऑफ माय फ्रेंड मेट विथ an accident! ”  युद्धात, प्रेमात आणि आता प्लेसमेंट मध्ये सगळं माफ असतं अशी मी समजूत काढून घेतली आणि धडधडीत खोटं बोललो! “वी admitted हिम इन दीनदयाळ हॉस्पिटल. आय had  टू  चेंज क्लोथ्स  and  कम ” मला कपडे बदलून यावं लागलं असं  मी माझ्या त्यावेळच्या इंग्रजीनुसार भाषांतरित करून सांगितलं. खोटं खोटंच!
“ओह, हाऊ  इज हि नाऊ?”
“नाऊ  हि इज ओके सर”
“ओके, वि had गीवन अ पझल टू  एवरीवन फिफ्टीन मिनिट्स back. नाऊ  सीन्स यु आ हिय, यु कॅन टेक धिस challenge बट  यू  have  टू  सीट इन  द केबिन, यू वील गेट थर्टी मिनिट्स”
“ओके सर” दीर्घ निश्वास सोडून मी केबिन मध्ये बसलो. कोडं सुटायला साधारण पाच मिनिटं लागली!  मला वाटलं काहीतरी चुकलं कि काय!! पुढची पाच मिनिट मला दुसरं काही सुचत नाही म्हटल्यावर मी पेपर परत द्यायला बाहेर गेलो.  त्यांनी  माझं उत्तर  पाहिलं…
“डिड  यू नो धीस अल्रेडी ?” क्लासरूम मधली बाकीची पोरं गेला अर्धा पाउण  तास झगडत होती आणि मी पाच मिनिटात उत्तर काढलं यामुळे  मी कुठून तरी कॉपी पेस्ट केलं कि काय अशी शंका येउन त्यांनी विचारलं.
“नो सर.” मी माझं लॉजिक त्यांना समजावून सांगितलं. सक्सेसफुली!!
वीसपैकी चौदा मुलं सिलेक्ट झाली! माझं नाव माझ्या कानांवर पडलं तेव्हा शरीरावरचा भार उतरून शरीर एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं!!

–X-O-X–

प्रोजेक्ट manager ने एक छोटेखानी भाषण केलं. सगळीच मुलं कशी चांगली होती परंतु आम्हाला काहींनाच चान्स देता येईल वगैरे वगैरे! समोर वाट बघणाऱ्या मुलांना त्यात काडीमात्र इंटरेस्ट नव्हता परंतु आम्हाला मान द्यायचा म्हणून मान हलवत होती ती बिचारी! एच आर ची ऑफर लेटर्स तयार होऊन हातात येईपर्यंत भाषण चाललं.  थोड्याच वेळात सिलेक्ट झालेल्या मुलांची नावं पुकारली गेली. एकेका  नावाबरोबर जल्लोष होत होता. २ panels ची मिळून ६ नावं जाहीर झाली. बाकीच्यांचे चेहरे पडले. सिलेक्ट झालेल्या मुलांनी येउन आमच्याशी हात मिळवले. मग त्यांच्याबरोबर पुन्हा एक छोटेखानी फोटोसेशन.

–X-O-X–

ऑफर लेटर हातात आलं. मी मोकळा श्वास सोडला! झालो एकदाचा सिलेक्ट!! केवढं ओझं उतरलं डोक्यावरचं… आता यापुढे कसली हुरहूर नाही कि जीवाला घोर नाही. कॉलेज  संपेपर्यंत आता नाटक, आर्ट  सर्कल आणि जमेल तसा अभ्यास. इंटरव्यू तर इतक्यात द्यायचाच नाही आयुष्यात! उशिरा का होईना प्लेसमेंट झाली तीसुद्धा कॉलेज मधल्या हायेस्ट पेयिंग कंपनीत. देर आये मगर दुरुस्त आये… या आधीची रिजेक्शन्स, टोमणे, माझ्या क्षमते विषयी घेतल्या गेलेल्या शंका एका क्षणात विसरून गेलो होतो मी.  आता होता निखळ आनंद. जो होता है अच्छे  के लिये होता है. घरी फोन करून कळवलं…आता रात्री मित्रांबरोबर पार्टी!!

–X-O-X–

कॉलेजच्या टी पी ओ नी  आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आटोपताच आम्ही सगळे बाहेर पडतो. चला! इथला प्लेसमेंटस चा खेळ आटोपला. आता नवीन कॉलेज ,नवीन मुलं . हातातला ब्लेझर गाडीत ठेऊन, टाय मोकळा करत मी गाडीत बसतो. कॉलेजमधून बाहेर पडता पडता गाडी स्लो करून मी मागे वळून कॉलेजकडे पाहतो… माझा मीच दिसल्याचा मला भास होतो. याच कॉलेजमध्ये, नऊ वर्षापूर्वी झालेल्या एका कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळालेलं ऑफर लेटर घेऊन, याच वाटेवरून गेटकडे धावणारा!


pandharpur – Yashodhan Kshirsagar’s inovation, yezdi modified in harley davidson

पंढरपूर : यशोधन क्षीरसागर या दुचाकी कारागिराने एक अनोखं काम केलं आहे. यशोधन यांनी कारागिराने जुन्या येझडी बाईकला चक्क हार्ले डेव्हिडसनचा लूक दिला आहे. तोही अवघ्या 40 हजार रुपयांच्या खर्चात. यशोधन हे अपंग असून ते अतिशय गरीब कुटुंबातील आहेत.   यशोधन यांना वाहनांचे अफाट ज्ञान तर आहेच. मात्र, त्यासोबत नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या वृत्तीमुळे यशोधन यांनी […]

The post pandharpur – Yashodhan Kshirsagar’s inovation, yezdi modified in harley davidson ^(http://marathiplus.in/goto/http://abpmajha.abplive.in/uncategorized/pandharpur-yashodhan-kshirsagars-inovation-yezdi-modified-in-harley-davidson-166353) appeared first on Marathi News ^(http://marathiplus.in/goto/http://abpmajha.abplive.in/).


712 Chya Batmya : Bhandara – Animal Vaccination planning issue

712 Chya Batmya : Bhandara – Animal Vaccination planning issue

The post 712 Chya Batmya : Bhandara – Animal Vaccination planning issue ^(http://marathiplus.in/goto/http://abpmajha.abplive.in/videos/712-chya-batmya-bhandara-animal-vaccination-planning-issue-166243) appeared first on Marathi News ^(http://marathiplus.in/goto/http://abpmajha.abplive.in/).Inauguration of Sahitya Sammelan by farmers

पिंपरी-चिंचवड : साधारणत: साहित्य संमेलनांची उद्घाटनं ही साहित्यिक किंवा राजकारण्यांच्या हस्ते केली जातात. मात्र, भोसरीतील विभागीय मराठी साहित्य संमेलनाचं शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेच्या वतीने 24 व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.   भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आज सकाळी शेतकऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं. यावेळी संत […]

The post Inauguration of Sahitya Sammelan by farmers ^(http://marathiplus.in/goto/http://abpmajha.abplive.in/pune/inauguration-of-sahitya-sammelan-by-farmers-166313) appeared first on Marathi News ^(http://marathiplus.in/goto/http://abpmajha.abplive.in/).


Can get close to any tech at 1/5 the price.

So, I got a way to get any technology device (TV, audio, consoles, phones) at 1/5 the price. Just thought I would share. I cant really show proof without showing the place that I get it from. But cheers! (I was gonna open a thread up, but I think it wi…